राणे कुटुंब विरुद्ध आमदार भास्कर जाधव यांच्यातील वादामुळे काल (१६ फेब्रुवारी) गुहागरमध्ये वातावरण तापलं होतं. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर काल दुपारी दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. त्यामुळे सध्या चिपळूणचे राजकारण तापलं आहे. या घटनेची माहिती देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे गुहागरमध्ये, माझ्या मतदारसंघात सभा घेणार अशी जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात ती व्हायरल करून येथील लोकांना उचकवण्याचा प्रयत्न केला होता”