शिवसेनेच्या दोन दिवसीय राज्यव्यापी महाअधिवेशनास काल (१६ फेब्रुवारी) प्रारंभ झाला. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आला. या महाअधिवेशनात पहिल्या दिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांनी संबोधन केलं. शिवसेनेचे वरिष्ठ नेते, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्रीकांत शिंदे यांच्याही डोळ्यात पाणी आलं. “आनंद दिघे गेल्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब शिवसैनिकांचा आधार बनले. शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानलं. काहीही झाल्यावर सर्वप्रथम पोहचणारे शिवसैनिक म्हणजे शिंदे साहेब. मी त्यांनी कायम शिवसैनिकांमध्ये पाहिलंय” असं म्हणताना श्रीकांत शिंदेंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्याचं पाहण्यास मिळालं.