मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अधिसूचनेचं रुपांतर कायद्यात झालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरु केलं आहे. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. यावेळी बोलताना “राजकीय नेते जर आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडासाफ होईल” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे