शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांची काल (१८ फेब्रुवारी) ठाण्यात जाहीर सभा होती. यावेळी पेपरफुटी, उद्योग, बेरोजगारी आणि सध्या चर्चेत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल चढवला. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला एक प्रकारे आव्हान दिलं आहे.