आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आम्ही लढतो आहोत. १०० ते १५० वर्षांपासून मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचं काही कारण नाही. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्या सगेसोयऱ्यांसाठीची अधिसूचना काढली आहे तिची अमलबजावणी केली जाईल. कुठल्या आरक्षणाला धक्का लागणारच नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारला करावीच लागणार आहे. आम्ही कुणबी होतो आणि आरक्षणातच होतो असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.