मराठा आरक्षणासाठी आज राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन होणार आहे. आरक्षणासंदर्भात नवा कायदा पारित होणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण मिळावं हीच सर्वांची भूमिका आहे. सरकारने कोणाच्याही भावनांशी खेळू नये, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.