मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीये. “तमाम मराठा बांधवांसाठीचा जो ठराव होता तो एकमताने सगळ्यांनी मंजूर केला. मला खात्रीने जो प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मांडलं गेलं त्याबाबत मला एक आशा आहे की हे टिकणारं आरक्षण असेल असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मराठा समाजाचंही मी अभिनंदन करतो. सरकाच्या हेतूवर मी आत्ता तरी संशय घेणार नाही. पण मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं हे नाकारता येणार नाही” असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.