महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचं निधन झालं. मनोहर जोशी यांची कारकीर्द कशी होती यावर आपण एक नजर टाकूयात..