पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मूक मोर्चा पार पडला. यावेळी बोलताना “पक्षाने आदेश दिल्यास पुणे लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिले. येत्या काळात प्रत्येक विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक मनविसे लढवणार असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सर्वाधिक प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं”