पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची दखल कुलगुरू शरद गोसावी यांनी घेतली आहे.आम्ही शांततेच्या मार्गाने आज मोर्चा काढला आहे.जर येत्या आठ दिवसात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला.