सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील मराठा बांधवांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर २५ फेब्रुवारीला अंतरवाली सराटीत महत्त्वाची आणि शेवटची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे मराठा बांधवांनी अंतरवालीत येण्याचं आवाहन जरांगेंनी केलं आहे.