राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं आहे. या चिन्हाचा आज किल्ले रायगडावरून अनावरण सोहळा पार पडत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील यावेळी उपस्थित आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय देत पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना दिलं. त्यानंतर शरद पवार गटाला आता कोणतं नवं चिन्ह मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागून होतं.