पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पात्राच्या संवर्धनासाठी शहरातील विविध पर्यावरणप्रेमी, सर्व पक्षीय राजकीय नेते मंडळीनी आज एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्या चर्चासत्राला ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावत अनेक मुद्दे देखील उपस्थित केले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे शहराच्या मध्य भागातून मुळा आणि मुठा नदी वाहत आहे. पण मागील काही वर्षात या नदीचे पात्र दोन्ही बाजूने भर घालून लहान करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहराच्या दृष्टीने धोकादायक आहे.