आजपासून (२६ फेब्रुवारी) राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. विरोधक राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे.