मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते. यादरम्यान त्यांना रात्री साडेबारा वाजता पोलिसांनी भांबेरी या गावांमध्ये थांबून पुढे जाण्यास मनाई केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा जरांगे पाटील आज (२६ फेब्रुवारी) सकाळी अंतरवाली येथे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. यादरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीमकडून तपासणी करण्यात आली.