“मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे पाटील यांना बोलायला लावणारे तुमच्या आजूबाजूला बसले आहेत का? ज्यांना महाराष्ट्र अस्थिर करुन काही वेगळं राजकारण करायचं आहे. जरांगे पाटील यांच्याविषयी माहिती असेलच. त्यांचे फोन वगैरे टॅप करण्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलं आहे. त्या अनुभवी आहेत या सगळ्याच्या बाबतीत. कोण कुणाशी बोलतंय, पाठिंबा देतंय हे रश्मी शुक्लांना माहीत असतं. त्यामुळे अनुभवी डी.जी. असलेल्या रश्मी शुक्लांशी चर्चा केली पाहिजे. फोन करणारे आपल्या सरकारमध्ये आहेत का? हे फडणवीसांनी जाणून घेतलं पाहिजे” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.