२६ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून आज २७ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. कोणत्या नव्या घोषणा होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसंच अंतरिम अर्थसंकल्पावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या आक्रमक भूमिकेनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.