राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमागे कारण काय होतं?, याबाबत त्यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.