“फोन टॅपिंगसाठी दिल्या गेलेल्या ठराविक नंबरमध्ये माझाही नंबर असावा”, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फोन टॅपिंगविषयी सूचक विधान केलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.