मनोज जरांगे हे शरद पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच भाजपा नेत्यांनीही शरद पवार गटाकडे बोट दाखवलं आहे. या आरोपांनंतर आता शरद पवार यांनीच त्यावर उत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन तपासा. माझ्या फोनवरून एक जरी फोन केल्याचं सिद्ध झालं तर तुम्हाला वाट्टेल ती गोष्ट मी मान्य करेन, असं थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला केलं आहे. पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.