भाजपा आमदार राम कदम यांनी एका कथित क्लिपचा उल्लेख करत थेट रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची धमकी या क्लिपमध्ये योगेश सावंत नावाच्या व्यक्तीने दिली आहे. योगेश सावंतच्या अटकेनंतर त्याच्या सुटकेसाठी रोहित पवारांनी फोन केला, असा दावा यावेळी कदम यांनी केला आहे. तसंच आमदार आशिष शेलार यांनी देखील या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे .