पुण्यातील काँग्रसेचे आमदार रवींद्र धंगेकर हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रसार माध्यमांसी संवाद साधताना पुन्हा एकदा त्यांनी आपली मन की बात बोलून दाखवली. पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवला तर तो सार्थकी लावू, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तसंच आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचंही ते म्हणाले.