मनोज जरांगेंच्या आरोपांवर अजय महाराज बारसकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही कोणावर आरोप करू शकतो. आरोपाला पुरावे लागतात, काही तथ्य लागतं. पुरावा नसतील तर आरोप शून्य असतात आणि माझ्यावरील आरोप हे शून्य आहेत. गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठ्यांचा द्वेष करतात. २०१७ पासून आम्ही सदावर्ते यांच्यासोबत संघर्ष करतोय, त्यांना मराठ्यांची तळमळ समजत नाही” असं विधान अजय महाराज बारसकर यांनी केलंय.