मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं आणि उपोषणांनंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी त्यांचं आंदोलन चालू ठेवलं आहे. यादरम्यान जरांगेंच्या मागे शरद पवार आहे असा आरोप करण्यात आला होता, यावर आता जरांगेंनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.