शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा, असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप झालेले होते. आर्थिक गुन्हे विभागाच्या या निर्णयानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय. “अजित पवारांना जर क्लीन चिट दिली असेल तर सुनेत्रा पवार यांनी फडणवीसांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा” असं विधान राऊतांनी केलंय.