अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. “जरांगे कधी हॉस्पिटलमध्ये असतो तर कधी अंतरवाली सराटीत असतो, हे त्याचं नाटक आहे. हे सर्व महाराष्ट्राला लक्षात आलं आहे. आता नोकर भरती झाली असून असून त्यात देखील मराठ्यांना आरक्षणाच्या नोकऱ्या देण्यासाठी जीआर निघाला आहे. हे सर्व करून देखील जरांगे ऐकत नसून मारुतीचे शेपटासारख्या त्याच्या मागण्या आहेत” अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर आला असताना दिली.