देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय. पुण्यात आज (४ मार्च) महायुतीची एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या संदर्भात ही बैठक होत आहे. रासप नेते महादेव जानकर यांना किंवा राष्ट्रीय समाज पक्षाच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये यावर चंद्रकांत पाटील आणि महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.