लोकसभा निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे महाविकास आघाडीसह, महायुतीमध्ये जागा वाटपांवरुन मित्रपक्षांमध्येच वाद रंगत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यादरम्यान भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी यासंबंधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित चिंता व्यक्त केली आहे. यावर पुणे राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.