शिरूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीवरून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले असतानाच डॉ. कोल्हे यांनी पवार यांना डिवचले आहे. मंचर येथील पोलीस अधिका-यांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत वेळ नसल्याने दाखवून देत ‘ घड्याळ बंद पडले का ?’ अशी विचारणा कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर पोलीस बांधवांसाठी ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ‘ तुतारी’ फुंकण्यास विसरू नका, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे.