कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा बिबट्या पसार झाल्याची माहिती सोमवारी (४ मार्च) समोर आली. पळालेला बिबट्या प्राणिसंग्रहालयातच असून गेल्या २४ तासांपासून त्याचा शोध सुरू आहे. खबरदारी म्हणून आज प्राणिसंग्रहालय देखील बंद ठेवण्यात आलं आहे. तसंच नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.