जालन्यात काल (५ मार्च) सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न झाली. सरकारने सगे-सोयरे कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी या बैठकीत मराठा आंदोलकांनी केली. आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला आमचा अधिकार कळतो, असं म्हणत प्रत्येक गावातून एक-दोन मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहेत. हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा नसून तो समाजाचा निर्णय आहे, असं म्हणत मराठा आंदोलकांनी आता राजकीय नेत्यांविरोधातच रणशिंग फुंकल्यांचं दिसत आहे.