पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाला. या उदघाटन सोहोळ्यास रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्थानकात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी,आमदार सुनील टिंगरे, आमदार रविंद्र धंगेकर, भाजपाचे माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपाचे नेते हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार मेट्रो मुख्य अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्यासह नागरिकदेखील उपस्थित होते.