राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दोन दिवसांपूर्वी मंचर येथे मेळावा पार पडला. त्यावेळी शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली होती. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. “आज आम्ही साठीच्या पुढे गेलो आम्हाला कधी मुभा मिळणार?” असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला. त्यावर अमोल कोल्हेंनीही “मग इतकी वर्ष संधी कोणी दिली?” असा प्रतिप्रश्न करत पलटवार केला आहे.