आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. महायुतीत भाजपाला शिंदे गट आणि अजित पवार गटाला जागा सोडण्याची कसरत करावी लागत आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गटाला वंचितसाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मोदींवर टीका करताना दिसतायेत.