लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. भास्कर जाधवांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक पत्रही लिहलं असून आपली भूमिका ते १० मार्च रोजी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट करणार आहेत. यासंदर्भात शिंदे गटातील आमदार योगेश कदम यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर भाष्य केलं आहे. ज्यावेळी आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते, असं योगेश कदम म्हणाले.