पुण्यातील मल्टिस्पेशालिटी हिलिंग हॅास्पिटलचा भूमिपूजन सोहळा आज (१० मार्च) पार पडला. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी नगरसेवकांचा मुद्दा उपस्थित करत महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची मागणी सरकारकडे केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.