गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर अखरे आज पडदा पडला. चिपळूणमध्ये घेतलेल्या जाहीर कार्यक्रमात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर भास्कर जाधव यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडलेली भूमिका आज जाहिररित्या सांगितली.