आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्याची मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यामधील मालमत्तेवर ईडीने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली. यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी रोहित पवार यांनी आज (१० मार्च) पत्रकार परिषद घेतली. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या कारभाराविरोधात भूमिका मांडत आलो आहे. त्यामुळे माझ्या विरोधात ईडी मार्फत कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात मी लढणार आणि माझा विजय देखील होणार, असं रोहित पवार यावेळी म्हणाले. कदाचित पुढचे दोन, तीन महिने जेलमध्ये टाकलं जाईल, अशी शक्यताही रोहित पवारांनी वर्तवली.