राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवारांनी अनेकदा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना टोला लगावत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यामुळे अनेकदा अजित पवारांनाही शरद पवार गटाकडून टीकेचा सामना करावा लागला. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांची बाजू आपल्यापरीने सावरण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. “दादांचा स्वभाव बारामतीकर जाणून आहेत. कधीही कोणाचा अनादर करायचा नव्हता, असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन बारामतीकरांना केलं आहे. बारामती येथे रविवारी (१० मार्च) कोष्टी व्हिजन ट्रस्टच्या वतीने आयोजित कोष्टी समाज स्नेह मेळाव्यात त्या बोलत होत्या.