आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्याची मालकी असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्यामधील मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला दोन, तीन महिन्यात तुरुंगात टाकलं जाईल अशी शक्यता वर्तवली. त्यासंदर्भात आज (११ मार्च) शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिलं. संजय राऊतांचं उदाहरण पाहिलं, त्यामुळे काही भरोसा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी शरद पवारांनी रवींद्र वायकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरही भाष्य केलं.