पारनेरनगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात सामील होणार अशी चर्चा होती. परंतु या चर्चांना आमदार निलेश लंके यांनी पूर्णविराम दिला आहे. शरद पवार आणि माझी कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही. शरद पवार गटात प्रवेश करणार या बातमीत काहीही सत्यता नाही, असं निलेश लंकेंनी स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.