मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. फडणवीस मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा जरांगे यांनी केला होता. जरांगेंच्या या आरोपांनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. काल (११ मार्च) त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल केलाय.