लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी केलेलं हे वक्तव्य चर्चेत आहे. बारामती या ठिकाणी एका मेळाव्याला संबोधित करताना शरद पवार यांनी एक भाष्य केलं आहे. “मी काम करत असताना पक्षाचा विचार केला नाही, माझ्या विचारांशी पक्कं राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे मागच्या ५६ वर्षांपासून निवडून येतो आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.