महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या मनातली खंत मांडली. तसंच आपण पक्ष का सोडला ते सगळं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. तसंच मी परतीचे दोर कापून टाकले आहेत. त्यामुळे मी मनसेत परतण्याचा काही प्रश्न येणार नाही. माझी भूमिका मी दोन ते तीन दिवसांत मांडेन असंही वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. कुणीही पक्षसंघटना सोडू नका असंही आवाहन यावेळी वसंत मोरेंनी केलं आहे.