आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं म्हणत नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हेच असतील, अशी घोषणा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. नाशिकमधील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. अशातच श्रीकांत शिंदेंनी नाशिकमधून आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर केल्याने आता चर्चा रंगली आहे.