महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या हातोडा स्टाईलने पुण्यात स्वतःचे वलय निर्माण केलं होतं. मागच्या दोन वर्षांपासून त्यांचा आणि पुण्यातील पक्ष संघटनेचा वाद सुरू होता. पक्षातील वरिष्ठांकडून यावर अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र मंगळवारी (दि. १२ मार्च) वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. यानंतर त्यांनी आज (१३ मार्च) प्रतिक्रिया दिली आहे.