भाजपाने बीडमधून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत होतं. मात्र लोकसभेच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव देण्यात आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणातली उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी निश्चित नसते. त्यामुळे मला आत्मविश्वास नव्हता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.