महाविकास आघाडीमधील जागावाटपावरून अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मविआत जाण्याबाबत वंचित बहुजन आघाडीही साशंक असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडे मविआ व्यतिरिक्त दुसरे कोणते पर्याय आहेत? याबाबत पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच माहिती दिली आहे. गुरुवारी (१४ मार्च) छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते.