महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र चालू आहे. याबद्दल “वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी आम्हाला जी २७ जागांची यादी दिली होती, त्यातल्या चार जागा आहेत. त्यावर आता वंचितच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आता त्यांनी आम्हाला त्यांची भूमिका कळवायची आहे. यात बोलवण्या किंवा न बोलवण्याचा किंवा मानसन्मानाचा प्रश्नच नाही. आम्ही कुणालाही निमंत्रण देऊन बोलवत नाही. मविआ एक कुटुंब आहे. प्रत्येकजण कधीही आमच्या त्या बैठकीत सहभागी होऊ शकतं. समाजमाध्यमातून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा कधीच केली जात नाही” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.