शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे गटात आणखी एक राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.